जम्मू काश्मीरमधील आनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. चकमकी दरम्यान, गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत दोन नागरिकही जखमी झाले. कालपासून सुरू झालेली ही दहशतवाद्यांसोबतची चकमक आजही सुरूच असल्याचं वृत्त आहे.
Site Admin | August 11, 2024 1:52 PM | Jammu and Kashmir
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत २ जवान शहीद
