मलेशिया खुल्या टेनिस स्पर्धेत बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी त्यांच्या गटांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या आधीच्या फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या ब्रायन यांगवर 21-12,17-21,21-15 असा पराभव केला. मालविकानं मलेशियाच्याच गोह जिन वेईचा 21-15, 21-16 असा पराभव केला.
मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी दक्षिण कोरियाच्या संग ह्यून को आणि हाय वोन एओम यांचा 21-13, 21-14 असा पराभव केला. मिश्र दुहेरीतल्या दुसऱ्या सामन्यात सतीश आणि आद्या यांनी भारताच्याच आशित सूर्या आणि अमृता प्रमुतेश यांचा 21-13, 21-15 असा पराभव केला.