पंजाबमधल्या मोहाली इथं काल रात्री तीन मजली इमारत कोसळून झालेल्या अपघाताचं बचावकार्य २३ तासांनंतर थांबलं आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला. ढीगऱ्याखाली कोणीही अडकलेलं नसण्याची शक्यता NDRF च्या जवानांनी व्यक्त केल्यामुळे हे बचाव कार्य आता थांबवण्यात आलंय. मोहालीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल ३ आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Site Admin | December 22, 2024 7:45 PM | Punjab