EPFO, अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत या वर्षी जूनमध्ये 19 लाख 29 हजार नवीन सदस्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत सदस्यसंख्येत 7 पूर्णांक 86 शतांश टक्क्यांनी वाढ झाली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयान आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. यात 18 ते 25 वयोगटातल्या सदस्यांची संख्या जास्त आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे. संघटनेच्या माहिती नुसार अंदाजे 14 लाख 15 हजार सदस्य बाहेर पडले होते आणि नंतर त्यांनी पुन्हा सदस्यत्व घेतलं.
Site Admin | August 21, 2024 1:09 PM | EPFO
EPFOमध्ये यावर्षी १९ लाख २९ हजार नवीन सदस्यांची नोंदणी
