डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल- केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर

भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल असं केंद्रीय नागरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे. ते सतराव्या भारतीय नागरी वाहतूक परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते.  गांधीनगरमधल्या महात्मा मंदीर इथं झालेल्या या परिषदेत खट्टर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या शाश्वत गरजेवर भर दिला.  

 

शाश्वत आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्थेसाठी सरकारने अनेक उपक्रम गेल्या दहा वर्षात हाती घेतले आहेत असं खट्टर यांनी यावेळी सांगितलं. वाहतूक व्यवस्थेसाठी तंत्रज्ञान, संशोधन हरित उपाय आणि खाजगी- सार्वजनिक भागीदारी याला महत्व आहे असंही खट्टर यांनी सांगितलं. या परिषदेत शहरी वाहतुकीच्या सर्वोत्तम  प्रकल्पांना गौरवण्यात आलं. यामध्ये कोची मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सर्वोत्तम शाश्वत वाहतूक व्यवस्था म्हणून तर भुवनेश्वरला सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर सूरतला सर्वोत्तम सक्षम वाहतूक  व्यवस्था म्हणून गौरवण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा