म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतल्या विविध वसाहतींमधल्या १७६ व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी राबवलेल्या ई-लिलावातल्या यशस्वी अर्जदारांना उद्यापासून, म्हणजे १० जुलैपासून तात्पुरतं देकारपत्र देण्यात येणार आहे. तसंच बोलीच्या १० टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित रकमेसाठी कर्ज घेण्यासाठी अर्जदारांना ना-हरकत प्रमाणपत्रही घेता येणार आहे. बोलीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर अर्जदारांना मंडळाद्वारे वाटपपत्र आणि अनिवासी गाळ्याचा ताबा देण्यात येईल, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे. या यशस्वी अर्जदारांच्या स्वीकृतीसाठी दहा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
Site Admin | July 9, 2024 7:15 PM | ई-लिलाव | म्हाडा