पुण्यात जीबीएसच्या संशयित रुग्णांची संख्या 173 झाली असून, 140 जणांना या आजाराचं निदान झालं आहे. या आजारमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या 72 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून 21 जण जीवरक्षक प्रणालीवर आहेत.
दरम्यान, दूषित पण्यामुळेच जीबीएस आजार होत असल्याचा अहवाल एनआयव्हीने दिला आहे. जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, एनआयव्ही आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची महापालिकेत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत एनआयव्हीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल सादर केल्याचं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. पी. पृथ्वीराज यांनी सांगितलं.
Site Admin | February 7, 2025 10:59 AM | GBS patients | Pune
पुण्यात जीबीएसचे 173 संशयित रुग्ण
