भारताने २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या कालावधीत देशातील क्षयरोगाचं प्रमाण सुमारे १७ टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, क्षयरोगाचा प्रसार कमी करण्यासाठी देशाने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.
‘क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये झालेली घट हे भारताच्या समर्पित आणि अभिनव प्रयत्नांचे फलित आहे. सामूहिक भावनेच्या माध्यमातून, आपण क्षयरोगमुक्त भारतासाठी कार्य करत राहू.’ असं प्रधानमंत्र्यांनी समाजमध्यमांवरील संदेशांत म्हंटलं आहे.