आंध्रप्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातल्या अच्युतापुरम सेझमधल्या औषध निर्माण कंपनीत काल झालेल्या अणुभट्टी स्फोटात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रूपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले असून कारखाना व्यवस्थापनात निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.