- गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत ३४ जिल्ह्यातील ३२४ तालुक्यातील पात्र १३५ गोशाळांना २०२३-२४ वर्षाकरता १७ कोटी २१ लाख रुपये, अनुदान स्वरुपात वितरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबवला जात असून देशी गोवंशाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यशासनानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या अनुदानातून गोशाळांनी दुग्धोत्पादन, शेती काम, पशुपैदास, ओझी वाहणं अशा कामांना उपयुक्त नसलेल्या गाय, वळू, बैल आणि वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करण्याकरीता चारा, पाणी – निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
Site Admin | September 12, 2024 9:23 AM | Govardhan Govansh Seva Kendra Yojana