इस्रायलनं काल गाझा पट्टीतल्या एका शाळेच्या इमारतीवर केलेल्या हवाई हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या इमारतीमध्ये हजारो विस्थापित लोक राहत होते, असं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. तर या शाळेच्या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना ठार केलं असल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलं आहे.
इस्त्रायलविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांसाठी मानवी ढाल म्हणून नागरी संरचना आणि लोकसंख्येचे शोषण करून हमासनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोपही इस्रायलनं केला आहे.