आगामी पॅरीस ऑलिम्पिकसाठी १६ सदस्यांचा भारतीय हॉकी संघ आज हॉकी इंडियानं नवी दिल्लीत जाहीर केला. या संघातले पाच हॉकीपटू पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणार असून तिसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळणारा अनुभवी हरमनप्रित सिंग कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करेल. तर हार्दिक सिंग उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. भारतीय संघाचा आधारस्तंभ असलेला दिग्गज गोलकीपर पी आर ब्रिजेश आणि मिडफील्डर मनप्रीत सिंग हे त्यांचं चौथं ऑलिम्पिक खेळत आहेत.
Site Admin | June 26, 2024 8:09 PM | हरमनप्रित सिंग
आगामी पॅरीस ऑलिम्पिकसाठी भारताचा हॉकी संघ जाहीर
