कार्बन उत्सर्जन कमी करून विकासाला गती देण्यासाठी जागतिक बँकेेने भारताला दीडशे कोटी डॉलर्सची मदत मंजूर केली आहे. ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रॉलायजर्स आणि नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देणं हा यामागचा हेतू आहे. याआधी जून २०२३ मध्ये जागतिक बँकेने दीडशे कोटी डॉलरची मदत भारताला दिली होती. वाढीव निधीमुळे भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादन करायला आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याला मदत होणार आहे. २०३० पर्यंत ५०० गिगवॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे.
Site Admin | June 30, 2024 1:47 PM
कार्बन उत्सर्जन कमी करून विकासाला गती देण्यासाठी जागतिक बँकेेकडून भारताला दीडशे कोटी डॉलर्सची मदत
