राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत लोककल्याणकारी योजनांसाठी १५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितलं. तामिळनाडू मधल्या थुथुकुडी इथं आज ते बोलत होते. पायाभूत सुविधांसाठी तीन लाख कोटी तसंच रेल्वेच्या विकासासाठी ६३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.