डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 26, 2024 3:19 PM | Sanjay Raut

printer

खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानी प्रकरणी १५ दिवसांची कोठडी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने आज १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातली १५४ सार्वजनिक शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या संस्थेला मिळालं होतं. मात्र, या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा