डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 17, 2024 2:46 PM

printer

१४९व्या श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलनाचं २७ ते २९ डिसेंबर रोजी पंजाबमध्ये आयोजन

भारतीय शास्त्रीय संगीतातल्या प्रतिष्ठेच्या आणि सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या १४९व्या श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलनाचं आयोजन पंजाबमधे जालंधर इथे करण्यात आलं आहे. जालंधरमधल्या श्री देवी तालाब मंदिराच्या प्रांगणात येत्या २७ ते २९ डिसेंबर दरम्यान हे संमेलन भरवलं जाईल. यंदाचं संमेलन हे विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांच्या स्मृतींना समर्पित केलं जाईल. झाकीर हुसैन हे हरिवल्लभ कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहेत, त्यामुळे तबलावादनाने या महोत्सवाची सुरुवात होईल, अशी माहिती संमेलन समितीच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या संमेलनापूर्वी २३ ते २६ डिसेंबर रोजी हरिवल्लभ संगीत स्पर्धेंच आयोजनही करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा