व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळ आणि त्यानंतर झालेल्या पूर आणि भुस्खलनामुळे जवळपास १४१ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण बेपत्ता आहेत. व्हिएतनामची राजधानी हानोईमधल्या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून आज दुपारपर्यंत यात आणखी वाढ होईल अशी शक्यता जल-हवामान विभागाने वर्तवली आहे. थाओ नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ होणार असल्याचं त्यांनी कळवलं आहे.
चक्रीवादळामुळे व्हिएतनामच्या ईशान्य भागात शनिवारी अनेक ठिकाणी दरड कोसळली. यात निवासी आणि औद्योगिक भागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याआधी फिलिपिन्स आणि चीनच्या हैनान बेटांना या वादळाचा तडाखा बसला होता.
Site Admin | September 11, 2024 2:05 PM | vietrnam | yagi | चक्रीवादळ