देशातल्या १४ पूरग्रस्त राज्यांना केंद्रसरकारने पाच हजार आठशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक निधी जारी केला आहे. यामध्ये महाराष्ट्राला एक हजार चारशे ९२ कोटी रुपये, आंध्र प्रदेशला एक हजार कोटी रुपये, गुजरातला ६०० कोटी रुपये आणि तेलंगणाला चारशे सतरा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या राज्यांना यावर्षी अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला. आसाम, मिझोराम, केरळ, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूर या राज्यांमध्ये नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकं पाठवण्यात आली होती. बाधित राज्यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभं असून या वर्षात २१ राज्यांना १४ हजार ९०० कोटींहून अधिक रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असं केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.