डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मक्का इथं धार्मिक विधी सुरू असताना १४ भाविकांचा मृत्यू

मुस्लिम धर्मात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या हज यात्रेचा उद्या शेवटचा दिवस आहे.  हज यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी जवळपास १८ लाख नागरिक सौदी अरेबियाला येतात. यात्रेदरम्यान तापमानाचा त्रास कमी करण्यासाठी सौदी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात परंतू  वाढत्या तापमानाचा फटका  हज यात्रेकरुंनाही बसत आहे. या आठवड्यात तिथे ४६ अंश सेल्सियसपर्यंत गेलेल्या तापमानाचा फटका यात्रेकरुंना विशेषतः वयोवृद्धांना बसला.  हज यात्रा करत असलेले जॉर्डनचे १४ नागरीक मृत्यू पावले तर सतरा जण बेपत्ता आहेत, अशी माहिती जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्रालयानं दिली आहे.  इराणच्या रेड क्रिसेंट  या स्वयंसेवी संस्थेने हज यात्रेवर असलेल्या पाच इराणी नागरीकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा