एका तासात पाच लाख रोपं लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवल्याबद्दल केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज १२८ इन्फंट्री बटालियन आणि पर्यावरणीय कृती दलाचं अभिनंदन केलं. राजस्थानच्या जैसलमेर इथे राबवलेल्या विशेष वृक्षारोपण मोहिमेत सैन्याने काल सुमारे ५ लाख २० हजार रोपं लावल्याची माहिती यादव यांनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात दिली. तसंच त्यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या भारतीय लष्कर, हवाई दल, सीमा सुरक्षा दल, पोलीस आणि विविध शैक्षणिक संस्थांचं अभिनंदनही केलं.
Site Admin | September 23, 2024 1:22 PM | Bhupendra Yadav
१२८ इन्फंट्री बटालियन आणि पर्यावरणीय कृती दलानं एका तासात पाच लाख रोपं लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवला
