यंदाच्या हंगामात राज्यात १२६ टक्के पाऊस पडला. सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हिंगोली आणि अमरावती वगळता राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अहमदनगरमध्ये ४९ टक्के तर सांगलीत ४८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. जळगाव, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला. हिंगोलीमध्ये सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी तर अमरावतीमध्ये २ टक्के कमी पाऊस झाला.
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा सुमारे २५८ मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९४ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधीत १ हजार २५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.