डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जळगाव रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यु

 

महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यातल्या १० जणांची ओळख पटली असून त्यात एक लहान मूल आणि तीन महिलांचा समावेश आहे.

शेजारच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्यामुळं अपघातग्रस्त डब्यातल्या अनेकांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्या आणि ते भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली सापडले असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वार्ताहरांना सांगितलं.

 

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिश महाजन,आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, यांनी घटनास्थळी भेट दिली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील 0257-22 17 193 या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. मदत कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होतं.

 

अपघातामुळं मुंबईकडून येणाऱ्या जाणाऱ्या सुमारे 8 गाड्या दीड ते दोन तास खोळंबल्या होत्या. मात्र आता रेल्वे वाहतूक पूर्ववत झाल्याचं पवार यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक साहाय्य जाहीर केलं. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा