छत्तीसगडमध्ये काल माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीच्या ठिकाणावरून सुरक्षादलानं १२ माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. छत्तीसगडमधल्या बीजापूर जिल्ह्यातल्या पामेड आणि बासागुडा विभागात काल ही चकमक झाली होती.
हे नक्षलवादी पीएलजी बटालियन नंबर वन आणि सेंट्रल रिजनल कमीटीचे सदस्य असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रं देखील ताब्यात घेतली आहेत. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे ३ जवानही जखमी झाले होते.