अमेरिकेत, लॉस एंजेलिस काउंटीजवळ लागलेल्या वणव्यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार १३ हजारांहून जास्त इमारती या आगीत नष्ट झाल्या असून जवळपास १ लाखाहून अधिक रहिवाशांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या या प्रदेशात चार मोठे वणवे लागले आहेत.
सांता मोनिका आणि मालिबू दरम्यान सर्वात मोठी आग लागली असून कालपर्यंत ही आग आठ टक्के आटोक्यात आली आहे. तर अल्टाडेना आणि पासाडिना जवळ लागलेली आग ३ टक्के आटोक्यात आली आहे. दरम्यान, पाणी व्यवस्थापनाशी संबंधित तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनं दिले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये लागलेला वणवा अनेक महिने सुरू राहण्याची शक्यता आहे.