छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ आयुक्तालय आणि मुंबई सीमा शुल्क विभागानं १७ ते २४ जून या कालावधीत विविध १८ प्रकरणांमध्ये ६ कोटी ८४ लाख रुपये किमतीचं सुमारे ११ किलो सोनं आणि सुमारे १७ लाख रुपयांचं परकीय चलन जप्त केलं. दुबई, कुवेत, मस्कत, सिंगापूर, अबुधाबी आणि लखनऊ इथं प्रवास करणाऱ्या १५ भारतीय आणि एक परदेशी अशा १६ तस्करांना या प्रकरणात अटक करण्यात आली.