छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल सिनेदिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. ऑस्कर विजेते साउंड डिझायनर पद्मश्री रसुल पुकुट्टी, राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.
Site Admin | January 20, 2025 3:26 PM | 10th Ajantha Verul International Film Festival