दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज घोषणा करण्यात आली. येत्या १५ ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर करण्यात आला आहे.
Site Admin | December 28, 2024 8:05 PM | 10th Ajanta Verul International Film Festival