डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्र सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन

विद्यमान केंद्र सरकारच्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने विविध मंत्रालयांकडून विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परिषदेच्या मुख्य सत्रादरम्यान “सहकार से समृद्धि” या संकल्पनेअंतर्गत, आतापर्यंत वंचित असलेल्या खेड्यांमध्ये  किंवा पंचायत समित्यांमध्ये दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था, प्राथमिक दुग्धव्यवसाय आणि मत्स्य सहकारी संस्थांच्या स्थापन आणि बळकटीकरणावर मार्गदर्शिका सुरू केली. तसेच “श्वेत क्रांती 2.0” आणि सहकारांमधील सहकार्यावर मानक कार्यप्रणाली देखील सुरू केली.शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सहकारी क्षेत्राला नवजीवन मिळावे यासाठी सहकार मंत्रालय स्थापनेची एक दीर्घकालीन मागणी होती, जी एनडीए सरकारने पूर्ण केली. 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, अलीकडेच सरकारने सुधारित प्रधानमंत्री जैव इंधन वातावरण अनुकूल पीक अवशेष निवारण योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी अवशेषांसाठी लाभदायक उत्पन्न उपलब्ध करून देणे आणि पर्यावरणीय प्रदूषणाचा सामना करणे आहे.ही योजना स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत करते आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी पूरक ठरते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत, नवीन सरकारच्या मागील तीन महिन्यांत या योजनेच्या लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिंडरच्या प्रति व्यक्ति वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा