राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ही मोहिम या महिन्यात सुरु झाली. या मोहिमेंतर्गत निःक्षय ही रुग्ण व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत आहे. शंभर दिवसात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाने पंजाब राज्यात वेग घेतला आहे. या अंतर्गत क्षयाच्या प्रादुर्भावाची शक्यता असणाऱ्या अठरा जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. या अंतर्गत बत्तीसशे चमूंनी आतापर्यंत वृद्ध, आजारी, धूम्रपान करणारे म्हणजेच या आजाराला बळी पडू शकतील अशा एक लाख सहा हजार व्यक्तींची तपासणी केली आहे. यासाठी १ हजार ३०० निःक्षय शिबिरं आणि १४ निःक्षय वाहनं तैनात केली आहेत.
Site Admin | December 24, 2024 1:47 PM | 100 Days TB Elimination