केंद्रीय आरोग्य आणिकुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 100-दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेत संपूर्ण देशभरात 10 कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 5 लाखांहून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. या मोहिमेत 455 जिल्ह्यांमध्ये तीन लाख 57 हजार क्षयरुग्णांचं निदान झालं आहे. या मोहिमेत 10 लाख शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच दुर्गम भागात ही मोहीम पोहोचवण्यासाठी 836 निक्षय वाहनं आणि दोन लाख 40 हजार निक्षय मित्रनियुक्त करण्यात आले होते.
Site Admin | February 23, 2025 9:57 AM | 100-Day TB Campaign
TB Campaign : १० कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी, ५ लाखांहून अधिक बाधित रुग्ण
