ओशिवरा इथल्या फर्निचर बाजाराला आज सकाळी आग लागल्याने १० दुकानं जळून खाक झाली. जोगेश्वरी पश्चिमेला स्वामी विवेकानंद मार्गावरच्या या बाजारातल्या लाकडी सामानाच्या गोदामाला सकाळी साडे अकराच्या सुमाराला आग लागली. अग्निशमन दलाच्या २० गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं .
Site Admin | February 11, 2025 3:08 PM | आग | ओशिवरा | फर्निचर बाजार
ओशिवरा इथल्या फर्निचर बाजाराला आग लागल्याने १० दुकानं जळून खाक
