डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुणे विभागातील पुण्यासह 10 रेल्वे स्थानकांना मिळालं ईट राइट स्थानक मानांकन

पुणे विभागातील पुण्यासह 10 रेल्वे स्थानकांना ईट राइट स्थानक मानांकन मिळालं आहे. अन्न तयार करण्यापासून ते प्रवाशांना खाण्यासाठी देण्यापर्यंतची प्रक्रिया प्रमाणित पद्धतीनं करण्याचं प्रशिक्षण या स्थानकांतील सर्व खाद्य विक्रेत्यांना देण्यात आलं आहे.

प्रवासाला जातानं घरचंच पौष्टिक, आरोग्यदायी अन्न सोबत घेण्याची भारतीय परंपरा आहे. विशेषतः रेल्वे प्रवासात. कारण प्रवास लांबचा असतो आणि वाटेत काय खायला मिळेल ते कसं असेल असा विचार असतो. हीच गरज आणि भावना विचारात घेऊन भारतीय रेल्वेनं संपूर्ण देशवासियांनीच योग्य ते अन्न खावं म्हणजेच इट राईट इंडिया या पुढाकारातून रेल्वे स्थानकांना इट राइट स्थानक मानांकन देण्यास सुरुवात केली आहे. या स्थानकांवर बनवलं जाणाऱ्या अन्नाची संपूर्ण प्रक्रिया प्रशिक्षणासह प्रमाणित करण्यात आली आहे. भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणाचं प्रमाणपत्र यासाठी देण्यात येतं, तत्पूर्वी त्रयस्थ संस्थेमार्फतही या प्रमाणित अन्नाची शहानिशा केली जाते. पुणे विभागातील रेल्वेच्या पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, दौंड, अहमदनगर, शिर्डी, शिवाजीनगर आणि कोपरगांव या स्थानकाना हे मानांकन मिळालं आहे. अगदी घरच्यासारखं आपल्या हातचं नाही पण ते सर्वांना खाण्यासाठी राइट असावं अशी ही सोय कायम राहावी आणि ही संकल्पना खाद्यपदार्थांच्या सर्वच विक्रेत्यांना लागू व्हावी अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा