डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पोलीस दल,खाणकाम आणि तुरुंग विभागातील सुरक्षा रक्षक पदांच्या थेट भरतीत अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देणार

पोलीस दल,खाणकाम आणि तुरुंग विभागातल्या काही पदांच्या थेट भरतीमध्ये हरियाणा सरकार अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देणार आहे.मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी काल चंडीगढ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

 

हरियाणाच्या पोलिस दलात कॉन्स्टेबल, खाण रक्षक, वनरक्षक,कारागृह वॉर्डन आणि विशेष पोलिस अधिकारी अशा पदांसाठी हे आरक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.ड गटातील पदांच्या भरतीत अग्निवीरांना वयात 3 वर्षांची सवलत दिली जाईल आणि पहिल्या तुकडीसाठी ही सवलत पाच वर्षांची असेल,असं त्यांनी सांगितलं. अग्निवीरांना क गटामध्ये पाच टक्के, तर ब गटात एक टक्का आरक्षण देण्यात येईल असंही सैनी यांनी जाहीर केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा