डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी १ हजार ५२१ उमेदवार अर्ज दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी एकूण १ हजार पाचशे २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६८० उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर येत्या २० जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

 

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २९ उमेदवारांचे सर्वाधिक ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. या मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांनी अर्ज दाखल केला आहे. दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात भाजपचे रमेश बिधूडी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांनी अर्ज दाखल केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा