दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी काल झाली, त्यात १ हजार ४० अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी एकूण १ हजार पाचशे २१ उमेदवारांनी अर्ज दाखल होते. उद्याच्या दिवसात अर्ज मागे घेता येणार आहेत.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांनी अर्ज दाखल केला आहे. तर दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात भाजपचे रमेश बिधूडी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांनी अर्ज दाखल केला आहे.