नॉन क्रिमिलेयरची मर्यादा 8 लाखांवरुन 15 लाख करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायचा निर्णय काल महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळानं घेतला. तसंच शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, लोहार, नाथपंथीय समाज, आणि पत्रकार तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळं स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला.
मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात, तसंच मदरश्यांमधल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार आणि कौशल्य विकास कंपनी स्थापन करणं, तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करायलाही मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली.