राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे गतवर्षीपेक्षा रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रात सुमारे दीडपटीने वाढ झाली आहे. ज्वारी, गहू, मकाच्या पेरणी क्षेत्राच्या वाढीबरोबरच यंदा तेलबियांच्या पेरणीचं क्षेत्र वाढलं आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात, आधीच्या सरासरी 54 लाख हेक्टर क्षेत्रावरून या वर्षी सरासरी 60 लाख हेक्टरवर पेरण्या होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
Site Admin | December 3, 2024 9:18 AM | rabi season