जळगाव जिल्ह्यातल्या कसोदा गावाजवळ पोलिसांनी काल रात्री दीड कोटी ४५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस काल रात्री एरंडोल विधानसभा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एका कारची तपासणी केली असता त्यात हे पैसे आढळून आले. ही रक्कम कोणाची आहे याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान अंमळनेर तालुक्यात एका कारमधून १६ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
Site Admin | October 24, 2024 3:37 PM | Jalgaon
जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या कारवाईत दीड कोटी ४५ लाख रोकड जप्त
