इस्राईलनं केलेल्या हवाई हल्ल्यामुळे लेबनानमधले सुमारे १२ लाख लोक विस्थापित झाले आहेत. इस्राईलनं बैरुत आणि उपनगरांवर सुरु असलेल्या हवाई हल्ल्याची तीव्रता वाढवल्यानं तसंच जमिनीवरूनही सैनिकी कारवाई सुरु केल्यानं लेबनानच्या दक्षिण आणि पूर्व भागातल्या लोकांनां आपली घरं सोडावी लागली आहेत. यापैकी काही विस्थापितांनी सुरक्षित भागात सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता आश्रय घेतला आहे तर अनेक विस्थापित देशाची सीमा ओलांडून सीरियामध्ये दाखल झाले आहेत.
Site Admin | October 3, 2024 8:39 PM | Israeli airstrikes | इस्राईल
इस्राईलनं केलेल्या हवाई हल्ल्यामुळे लेबनानमधले सुमारे १२ लाख लोक विस्थापित
