युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं १ ते ३ एप्रिल दरम्यान नवी दिल्ली इथं विकसित भारत युवा संसदेचं आयोजन केलं आहे. देशभरातल्या ७५ हजार युवांनी माय भारत पोर्टलमधे आपली व्हिडिओ नोंद केली आहे. जिल्हा नोडल फेरी, राज्य फेरी आणि राष्ट्रीय फेरी अशा तीन टप्प्यात विकसित भारत युवा संसद होत असल्याचं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सांगितलं.
Site Admin | March 30, 2025 8:57 PM | 𝐕𝐢𝐤𝐬𝐢𝐭 𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭 𝐘𝐨𝐮𝐭𝐡 𝐏𝐚𝐫𝐥𝐢𝐚𝐦𝐞𝐧𝐭
नवी दिल्लीत १ ते ३ एप्रिल दरम्यान विकसित भारत युवा संसदेचं आयोजन
