बिहारमध्ये हॉकी इंडियाच्या सहकार्याने १२व्या पुरुष हॉकी हिरो आशिया कप २०२५ चं आयोजन करण्यात येणार आहे. पाटण्यामध्ये हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण (बीएसएसए) यांच्यात आज एक सामंजस्य करार झाला. ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित केली जाणार आहे. दक्षिण कोरिया, भारत आणि पाकिस्तान यासारख्या आशियातील विविध देशातले एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
Site Admin | March 31, 2025 7:27 PM | Hockey | 𝐌𝐞𝐧'𝐬 𝐇𝐨𝐜𝐤𝐞𝐲 𝐇𝐞𝐫𝐨 𝐀𝐬𝐢𝐚 𝐂𝐮𝐩 𝟐𝟎𝟐𝟓
बिहारमध्ये पुरुष हॉकी हिरो आशिया कप २०२५ चं आयोजन करण्यात येणार
