इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं उपग्रह प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुमारे १४३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा महसूल मिळवला आहे. इस्रोनं गेल्या दशकभरात एकूण ३९३ परदेशी उपग्रहांचं आणि तीन भारतीय ग्राहकांच्या उपग्रहांचं व्यापारी तत्त्वावर प्रक्षेपण केलं आहे. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर यासह ३४ देशांचे उपग्रह इस्रोनं प्रक्षेपित केले आहेत.
Site Admin | March 14, 2025 9:02 PM | ISRO
उपग्रह प्रक्षेपणातून इस्रोनं १० वर्षात कमावले १४३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
