ॲक्ट ईस्ट धोरणाद्वारे भारत आशियाई एकता आणि केंद्रस्थान कायम राखेल, असं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. आज चौदाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.
सीमा सुरक्षा सुनिश्चित करणं, देशांतर्गत गुन्हेगारी रोखणं, हिंसाचार कमी करणे आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना पुढे नेण्याकडे भारताचे लक्ष आहे. गाझामध्ये वाढ आणि संयम राखण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
लाल समुद्रातल्या व्यावसायिक जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सागरी शिपिंगची सुरक्षा निश्चित करण्यासाठी भारत स्वतंत्रपणे योगदान देत आहे, असंही त्यांनी सांगितलं.