९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीच्या सरहद संस्थेत होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं आज मुंबई मराठी साहित्य संघ इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या संमेलनासाठी एकूण सात संस्थांनी निमंत्रण दिलं होतं. त्यापैकी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेची इचलकरंजी शाखा, नॅशनल लायब्ररी, मुंबई आणि दिल्लीच्या सरहद या संस्थांना मंडळाच्या स्थळ निवड समितीनं भेट दिली होती. संमेलनासाठी जागा, निवास व्यवस्था, संस्थेचे मनुष्यबळ, पुस्तक प्रदर्शनाची जागा आदी मुद्द्यांचा विचार करून सरहद संस्थेची निवड केल्याची माहिती महामंडळानं दिली आहे.
Site Admin | August 4, 2024 7:01 PM | मुंबई मराठी साहित्य संघ | ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन