गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात केलेल्या खरेदीची रक्कम अदा करण्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा विपणन महासंघाच्या खात्यात वर्ग केला गेला आहे. यानंतर आता येत्या सोमवार पासून धान्याच्या खरेदीचा परतावा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत केला जाणार आहे. गेल्या रब्बी हंगामात गोंदिया जिल्हा विपणन महासंघानं जिल्ह्यातल्या ११ हजार ६०५ शेतकऱ्यांकडून ५ लाख १२ हजार किविंटल इतक्या धान्याची खरेदी केली होती. मात्र त्याचा परतावा अद्याप दिला गेला नव्हता. याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाठपुरावा केला गेला . आत्ता आलेल्या निधीतून ९ हजार शेतकऱ्यांना परतावा दिला जाणार आहे. तर उर्वरित १२ कोटी रुपये महासंघाच्या खात्यात वर्ग झाल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांनाही परतावा दिला जाईल असं महासंघानं कळवलं आहे.
Site Admin | July 13, 2024 9:05 PM