२०२४चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि देशासाठी अमृत पिढी घडवणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा देशाच्या १४० कोटी जनतेला मिळणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केला. या अर्थसंकल्पात फक्त गरिबांचं नाही, तर शेतकरी, युवा आणि महिलांचंही हित साधलं जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Site Admin | July 28, 2024 7:45 PM | अर्थसंकल्प | पियुष गोयल
२०२४चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि देशासाठी अमृत पिढी घडवणारा असल्याचं मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन
