देशात २०२३-२४ या वर्षांत संरक्षण सामुग्रीचं विक्रमी मूल्याचं उत्पादन झालं. २०२३-२४ या वर्षांत उत्पादन मूल्य सुमारे एक लाख २६ हजार ८८७ कोटी रुपयांपर्यंत होतं. ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत १६ पूर्णांक ८ शतांश टक्क्यांहून अधिक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गंत नवनवीन विक्रम होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
याच पोस्टमधे राजनाथ सिंह यांनी संरक्षण सामुग्रीचं उत्पादन करणाऱ्या सार्वजनिक आणि खासगी उद्योगांचंही अभिनंदन केलं.संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार २०२३-२४ या वर्षांतल्या उत्पादनांच्या एकूण मूल्यापैकी सुमारे ७९ पूर्णांक २ दशांश टक्के योगदान सार्वजनिक तर २० पूर्णांक ८ दशांश टक्के योगदान खासगी क्षेत्राचं आहे. जागतिक पातळीवर भारताला मुख्य संरक्षण केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी अनुकूल वातावरण करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध असल्याचं ही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.