खादी आणि ग्रामोद्योगाच्या उत्पादनांनी २०२३ – २४ या काळात पहिल्यांदाच विक्रीचा १ लाख ५५ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खादी आणि ग्रामोद्योगानं उत्पादन, विक्री आणि रोजगार निर्मितीत नवे विक्रम स्थापन केले आहेत, असं ते म्हणाले. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हा खादी ग्रामोद्योगाचा मुख्य उद्देश असून खादी आजच्या युवकांची फॅशन बनली आहे, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | July 9, 2024 7:55 PM | खादी आणि ग्रामोद्योग