१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या सोमवारपासून, म्हणजेच २४ जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात हंगामी सभापती भर्तृहरी मेहताब नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. लोकसभेच्या नव्या सभापतीपदाची निवडणूक २६ जून रोजी होईल, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जूनला संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण करतील. राज्यसभेचं अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ३ जुलै रोजी संपेल.
Site Admin | June 22, 2024 7:57 PM | अधिवेशन | खासदार | द्रौपदी मुर्मू
१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या सोमवारपासून
