डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

१२व्या पारपत्र दिनानिमित्त एस जयशंकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

१२व्या पारपत्र दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पारपत्र कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांना पारपत्र सेवा विश्वासार्ह आणि वक्तशीर मिळावी याकरता पारपत्र कार्यालयं करीत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.

 

२०२३ मधे देशात एक कोटी ६५ लाख नागरिकांना पारपत्र देण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. नागरिकांना देशात आणि देशाबाहेरही सुलभपणे पारपत्रं मिळावी याकरता डिजीलॉकर, पासपोर्ट पोलीस अप अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचंही जयशंकर यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा